हेटवणे येथील चंद्रकांत तेलंगे यांचे दुःख निधन
कोलाड-कल्पेश पवार
कोलाड विभागांतील सामाजिक कार्यकर्ते तथा सुपरिचित असणारे कै.माणिकराव तेलंगे यांचा मुलगा कै.चंद्रकांत माणिकराव तेलंगे यांचे शनिवार दि.१०/०८/२०२४रोजी अल्पशा आजाराजे दुःख निधन झाले आहे.
कै.चंद्रकांत तेलंगे यांच्या पार्थिवावर हेटवणे -येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या अंत्ययात्रेस राजकीय,सामाजिक,
वारकरी,आदी क्षेत्रातील मान्यवरांसह पंचक्रोशीतील नागरिक,नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कै.चंद्रकांत माणिकराव तेलंगे हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असायचे सगळ्यांना आपुलकीने प्रेमाने वागणूक देणे हे सर्वाना आवडत म्हणून ते सर्वाचे लाडके पिता, मामा, काका म्हणून परिचित होते..त्यांना धार्मिक तसेच सामाजिक कार्यात नेहमी आवड असायची. कै.चंद्रकांत तेलंगे हे .कै माणिकराव तेलंगे यांचा मुलगा रोहे येथील शिवसेना तालुका अध्यक्ष समीर शेडगे यांचे मामा होते.
त्यांच्या दुखःद निधनाबद्दल सर्वत्र हळहल व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या पश्चात कुटुंबामध्ये मुलगा प्रसाद तेलंगे आणि तेलंगे मोठा परिवार असून,कै.चंद्रकांत तेलंगे यांचा दशक्रियाविधी; सोमवारी दि.१९/०८/२०२४ रोजी पाली उद्धर येथे होणार आहे तर अंतिम धार्मिक विधी बुधवार दि.२१/०८/२०२४ रोजी राहत्या घरी हेटवणे येथे होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयां कडून देण्यात आली आहे.