कोलाड नाक्यावर रोहा रोड लगत श्री शारदा म्युझिकल चे शानदार उद्घाटन
कोलाड- कल्पेश पवार
कोलाड आंबेवाडी नाका येथे शंभर गाळे रोहा रोड लगत व्ही बी साळुंखे तबले वाले यांचे नवीन श्री शारदा म्युझिकल चे शानदार उद्घाटन मंगळवार दि.६ ऑगस्ट रोजी मोठया उत्साहात करण्यात आले सुपरिचित असणारे अमोल साळुंखे हे गेली कित्येक वर्षे आपला तबल्याचा व्यवसाय करीत आहेत.आता पुढे येउ घातलेल्या पारंपरिक सणानिमित्त ढोलकी ला विशेष महत्व असल्याने सर्वजण आता ढोलकी सजवणे,शाही लावणे,नाल ओढणे,नवीन खरेदी करणे ही कामे ग्राहक अगोदर चं करीत आहेत.आता श्रीकृष्ण जन्म,गौरी गणपती सण येत असल्याने आपल्या चालू असलेल्या व्यवसाय ला जोड म्हणून त्यानी श्री शारदा म्युझिकल या दुकानाचे शानदार उद्घाटन केले आहे.येथे विक्रीसाठी नवनवीन ढोलकी,तबले,बेंजो साहित्य,गिटार,आदि म्युझिकल वस्तु विक्रीसाठी ठेवल्या आहेत.तरी ग्राहकांनी येथे एक वेळ आवश्यक भेट घ्यावी असे आहवन विक्रेते
व्ही बी साळुंखे चे मालक अमोल साळुंखे यांनी केले आहे.